Education Inspector   North Zone


Homepage Slider Web Design New Template Business Website Business Website Business Website
Recent Activities 1) demo activity   

Welcome to E I North

Model Girl 1

मित्र हो, सप्रेम नमस्कार

शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभागातील सर्व शाळा मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षण प्रेमी नागरिकांचे मी www.einorth.com या संकेतस्थळावर स्वागत करतो. "Education Is A Process Of Illumination, Enlightnment Empowerment " (शिक्षण ही प्रकाशित, प्रबुध्द आणि माणसाला समर्थ करण्याची प्रक्रिया आहे.) प्रामाणिक आणि निश्चित ध्येये समोर ठेवून दिले जाणारे शिक्षण हे समाज परिवर्तनाची ताकद असते आणि म्हणुन सुसंघटीत आणि सुसंस्कारीत समाज घडविण्याच्या दृष्टिने

  • बालकेंद्रीत शिक्षण (Child centered education)
  • आनंददायी शिक्षण (Joyful education)
  • सर्वांसाठी शिक्षण (Education for all)
  • गुणवत्तापुर्ण शिक्षण (Quality education)

ही सर्वसामान्य उद्दिष्टे समोर ठेवुन तुम्ही आम्ही शैक्षणिक वाटचाल करीत आहोत. शिक्षण निरिक्षक बृहन्मुंबई उत्तर विभागांतर्गत येणारा शैक्षणिक विभाग हा तसा संमिश्र विभाग आहे एकीकडे सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा असलेल्या सुसज्ज शाळा, दुसरीकडे झोपडपट्टी/चाळींमधुन आपले अस्तित्त्व टिकवुन गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न करणा-या मराठी-उर्दु माध्यमांच्या शाळा देखील येथे बघावयास मिळतात. याच प्रमाणे भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्यांक दर्जा. असलेल्याही अनेक शाळा या विभागात आहेत.

आजचे युग हे संगणकाचे युग आहे. संगणकाचे स्थळ - काळाच्या कक्षा ओलांडुन संपुर्ण जगाला जवळ आणले आहे, आधुनिक तंत्रज्ञानने माहितीची क्षितीजे विस्तारली आहेत. " Change Is The Law Of Nature " या उक्ती प्रमाणे शिक्षण क्षेत्रात देखिल बदलसा काळाबरोबर नवनवीन बदल होत असतात. हे झालेले बदल, शासनाची ध्येयधोरणे, निर्गमित झालेली शिक्षण विषयक शासननिर्णय, परिपत्रके, आदेश इत्यादी क्षणार्धात शाळा शाळापर्यंत पोहाचविण्याकरिता Internet सारखे दुसरे माध्यम नाही आणि म्हणुनच आपल्याला माहितीचे आदान प्रदान करता यावे, सदोदीत शाळांच्या संपर्कात राहता यावे या करीता www.einorth.com हे संकेतस्थळ सुरु करण्याचा मानस होता. तो आज तडीस गेला आहे. मला आशा आहे की , आपण सर्व या संकेतस्थळाला मोठया संख्येने भेट दयाल आणि शिक्षण विभागाच्या सदैव संपर्कात रहाल. शेवटी महात्मा गांधी म्हणतात त्याप्रमाणे,

  • " संपर्कातुन सुसंवाद साधुया,
  •   संपर्कातुन उणिवा शोधु या,
  •   संपर्कातुन सुसंघटन साधु या,
  •   संपर्कातुन गुणवत्ता विकास साधु या "

Anil SableEducation InspectorNorth Zone


Gallery
Start View More
Top of Page